PHOTO GALLERY
EVENTS
CONTACT US
CONCERTS
AWARDS
THEATER

जिल्ह्यातील कलाकार मित्रांच्या सोईसाठी संस्थेने 'छोटे नाटकघर' निर्माण केले आहे. हे नाटकघर जिल्ह्यातील आणि परिसरातील कलाकार मित्रांसाठी २६ जानेवारी २०००७ पासून खुले करण्यात आले. निर्माण केलेली एखादी कलाकृती जाणकार रसिकांनी अनुभवावी, त्याबद्दल चर्चा व्हावि, असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. परंतु त्यासाठी मोठे थिएटर परवडत नाही व छोट्या हालचे भाडे पण परवडत नाही. विशेषतः अशा हालमध्ये कलाकारांना पाहिजे असलेल्या सुविधा उपलब्ध नसतात. त्या इकडून तिकडून जमा करणे, त्याची ने आण करणे हे दमछाक करणारे असते. मुळात अशा कलाकारांना चांगला प्रेक्षक पण मिळणे आवश्यक असते.या सर्व गोष्टींचा विचार करून संस्थेने एक छोटे 'नाटकघर' उभे केले आहे. हे 'नाटकघर' अगदी अल्प मूल्यात म्हणजेच फक्त वीज खर्चासाठी नाममात्र शुल्क घेऊन दिले जाते. दोनशे प्रेक्षक या नाटकघरात भारतीय बैठकीत बसण्याची सोय आहे. या नाटकघरामध्ये नृत्य, गायन, अभिवाचन , काव्यवाचन, कथाकथन, एकांकिका, नाटक असे सर्व प्रकार सादर करता येतात. या योजनेला उत्तम प्रतिसाद लाभत असून आजवर गोवा , पुणे, कणकवली व परिसरांतील कलाकारांनी यांचा लाभ घेतला आहे. आजवर जवळ जवळ २५ कार्यक्रम या योजनेअंतर्गत सादर झाले आहेत.